Home

देवलमामलेदार यशवंतराव महाराज

शाली वाहन शके सतरा
सदोतीसाव्या साली
भाद्रपदात पहिल्या पक्षी
नवमी गुरुवारी
पुणे शहरी शनिवारात
ओंकाराच्या महाली 
प्रभात काली जन्म जाहला
सूर्योदयी समयी

A homepage section

संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज

संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा जन्म ता. १३ सप्टेंबर १८८५ इ. सन रोजी पुणे जि. पुणे या गावी झाला. श्री. रा रा धोंडोनारायण भोसेकर हे श्री महाराजांचे आजोबा रूग्वेदी ब्राम्हण घरंदाज व सदाचार संपन्न परमदेवधर्मी होते. त्यांचे कुलदैवत श्री नरहरी होते. धोंडोपंतांना एकच महादेव नावाचा मुलगा होता. तेच हे महादेव महाराजांचे पिता होय. व सौ. हरिबाई ह्या श्री महाराजांच्या मातोश्री होय. सौ. हरिबाई व श्री रा रा बाळाजी मकाजी वाजपे. श्री पेशवे सरकारचे दिवाण माणकाश्वर यांचे हे कारभारी होते.

व हे वाजपे पुणे पेठ शनिवार घर नं. ११८ ओंकारांचा वाडा हल्ली शनिवार पेठेतील काँर्पोरेशनच्या शेजारील दवाखान्याच्या शेजारील या वाडयात या संताचा जन्म झाला. महाराजांच्या जन्मदिवशीच त्यांच्या मातृ आजोबांचे एक इच्छित कार्य पार पडले. म्हणुन त्यांचे नाव “यशवंत” असे ठेवण्यात आले. महाराजांचे शिक्षण इंग्रजी ४ थी पर्यंत पुणे येथे झाले. सकाळी महाराज नित्यनियमाने उठुन देवदर्शन घेऊन नंतर वडिल व आई यांना नमस्कार करुन अभ्यास करायला जात. महाराज अभ्यासात हुशार होते. गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यास महाराज नेहमीच तत्पर असत. एखाद्याकडे बोरु नसला तर महाराजांकडुन त्याला बोरु मिळे. कुणाजवळील शाई संपली की महाराजांकडुन त्याला मिळे. हेमाडपंती मोडी लिपीतील सुवाच्छ अक्षर अनेकांना मोहुन टाकी. अभ्यास कुलाचार व ईश्नर भक्ती यात महाराज सदैव रममाण असत. शालेय शिक्षणाबरोबरच कुलकर्णुणाचे शिक्षणदेखील महाराज शिकले. १७४९ फाल्गुन वद्य सप्तमी शुक्रवार ७ गोरज मुहुर्तावर यशवंतराव महाराज व सुंदराबाई यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यावेळी सुंदरा ६ वर्षांची होती. जीवाजीरावांनी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा साजरा केला. महाराजांना ७५० रु. वरदक्षिणा मिळाली. पितृगृहाची सुंदरा सासरी रुक्मिणी झाली. या विवाहसोहळ्यात दोन्ही बाजुंनी विपुल अन्नदान झाले. त्यांचे कवित्व ” भोसे” व “टेंभुर्णी ” या गावातील लोकांना बरेच दिवस पुरले.

About

|| देवमामलेदार || 

संपुर्ण नाव :- श्री यशवंतराव महादेव भोसेकर
मुळगाव :- करकम, भोसे, ता. पंढरपुर, जि. सोलापुर
वडिलांचे नाव :- श्री महादेव धोंडोपंत भोसेकर
आईचे नाव :- सौ हरिदेवी किंवा हिराबाई
भावंडे :- ८ भाऊ १ बहिण
१. वडिल भाऊ (दादा) २. यशवंत
३. मनोहर ४. आबा
५. रामचंद्र ६.प्रल्हाद
७. वासुदेव ८. बलराम
९. बहिण – सखुबाई
असे होते महाराजांचे कुटुंब
पत्नीचे नाव :- सौ सुंदराबाई किंवा रुख्मिनीबाई(आई)
गुरुंचे नाव :- श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट)
जन्म तीथी :- शालीवाहन शके १७३७, भाद्रपद शुध्ददशमी बुधवार सुर्योदय
जन्म तारीख :- १३ सप्टेंबर १८१५
सुंदराबाईंच्या वडिलांचे नाव :- जीवाजी बापुजी देशपांडे
लग्नाची तीथी :- शके १७४९ फाल्गुन वद्य सप्तमी सुंदराबाई त्यावेळेस ६ वर्षाच्या होत्या लग्नात ७५० रु. वर दक्षिणा दिली. ती सर्व रक्कम अन्नदानात खर्च केली
महाराजांचा परिवार :- तीन पुत्र व एक कन्या पण……ती सर्व तीन महिन्यापेक्षा अधिक जगली नाहीत.

महाराजांचे जन्मस्थळ :- पुणे ओंकारवाडा
सटाण्यातील यात्रेची सुरुवात व पादुकांची स्थापना :- १९ डिसेंबर १९१९ मध्ये
सटाण्यातील वास्तव्य :- सप्टेंबर १८६८ ते १८७३ पर्यंत ५ ते ६ वर्षाचा काळ
सटाण्यातील खजिना वाटला :- गोरगरिबांसाठी सन १८७०-७१ साली १ लाख २७ हजार रु. वाटले तो खजिना पांडुरंग व स्वामी समर्थांच्या कृपेने भरलेला निघाला.
महाराजांचे वैकुंठगमण :- मृत्यु – मार्गशीर्ष वद्य एकादशी, ११ डिसेंबर १८८७ रविवार रोजी सकाळी ६ वाजता नाशिक गोदावरी काठी.
देवमामलेदार हे शब्द म्हणजे सात अक्षारांचा मंत्र त्यांच्या स्मरणात भक्तीची प्रेरणा आहे जो त्यांना भजेल त्यांच्या जीवनात ते आधारवाड बनतील! सामान्य माणसांचा संतच आधार आहेत संत माणुसकी स्वत:त घडवितात आणि जडवितात हेच संत मामलेदारांनी केले त्यांची मामलती म्हणजे सर्वांना न्याय होता, जराही भ्रष्टाचाराला वाव नव्हता त्यामुळे शिष्टाचारांनाही तोच न्याय जो गोरगरिबांना न्याय असे यशवंतराव देव बनले ! देवाचे सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान त्यांच्यात प्रगट झाले आशा देव माणसाच्या किंवा देवपुरुषाच्या चरणी आमचे सदैव वंदन !! जे मनात तेच आचरणात, तेच संसारात आणि तेच नोकरीत हा सिध्दांत त्यांच्या जीवनात अखंड होता वरिष्ठांशी नम्रपणे वागणारा हा मुलुखावेगळा मामलेदार कनिष्ठांनी विनयाने वागत असे अधिकाराचा गर्व नाही कुणाला दमबाजी नाही आणि कुणावर अन्याय नाही अशी ही देवमुर्ती ज्या न्यायासनावर बसत असे ते धन्य होय ! न्यायादानाच्या कामात देखील त्यांनी आपली मामलतदार व संत्वन यांची अजोड समन्वय साधला होता.

नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला यशवंतराव महाराज पटांगण असे नाव दिले.

 

देवलमामलेदार यशवंतराव महाराज

शाली वाहन शके सतरा
सदोतीसाव्या साली
भाद्रपदात पहिल्या पक्षी
नवमी गुरुवारी
पुणे शहरी शनिवारात
ओंकाराच्या महाली 
प्रभात काली जन्म जाहला
सूर्योदयी समयी

Contact